सन्मान आणि पुरस्कार

गौरव आणि सन्मान

शताब्दी सन्मान आणि महापौर चषकापासून लोकसत्ता पुरस्कार आणि भारतीय रत्न सन्मानापर्यंत — बाबी बांदेकरांच्या कलेला मिळालेली सन्मानाची साथ!

ओरिएंट–सामना गणेशदर्शन
Featured

प्रथम पारितोषिक, मुंबई विभाग (१९९२)

ओरिएंट–सामना गणेशदर्शन

सार्वजनिक गणेशोत्सव शताब्दी वर्ष १९९२ निमित्त चेंबूरच्या सह्याद्री क्रिडा मंडळासाठी तयार केलेल्या बारा फूट उंच गणेशमूर्तीला मुंबई विभागात प्रथम पारितोषिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रदान.

महापौर चषक — चेंबूर

उत्कृष्ट गणेशमूर्तीकार (१९९२)

महापौर चषक — चेंबूर

चेंबूर विभागातून उत्कृष्ट गणेशमूर्तीकारास दिला जाणारा महापौर चषक महापौर श्री. चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते प्रदान — त्याच सन्माननीय हंगामातील आणखी एक गौरव.

गिरनार लोकसत्ता गणेशदर्शन

सर्वोत्कृष्ट मूर्तिकार — वाशी ते पनवेल (१९९९)

गिरनार लोकसत्ता गणेशदर्शन

प्रेरणा सेवा मंडळ, सेक्टर-६, वाशी, नवी मुंबई येथील मूर्तीसाठी सर्वोत्कृष्ट मूर्तिकार प्रथम पारितोषिक — सन्मानपत्र, मानचिन्ह व रोख पुरस्कार.

माणिकचंद लोकसत्ता गणेशदर्शन

सर्वोत्कृष्ट मूर्तिकार — प्रथम पारितोषिक, नवी मुंबई ते पनवेल (२००१)

माणिकचंद लोकसत्ता गणेशदर्शन

प्रेरणा सेवा मंडळ, सेक्टर-६, वाशी येथील मूर्तीसाठी माणिकचंद लोकसत्ता गणेशदर्शन स्पर्धा २००१ — सर्वोत्कृष्ट मूर्तिकार प्रथम पारितोषिक.

नागरी–सांस्कृतिक सन्मान

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत

नागरी–सांस्कृतिक सन्मान

राज ठाकरे यांच्या उपस्थितीतील नागरी–सांस्कृतिक सन्मान — महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेतील गणेश चित्र मंदिर कार्यशाळेची ओळख.

लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा

सर्वोत्कृष्ट मूर्तिकार आणि सर्वोत्कृष्ट मूर्ती (२०१८)

लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा

सेक्टर १७, वाशी येथील 'नवसाला पावणारा महाराजा' — बाबी बांदेकरांच्या पंचरत्नांनी साकारलेल्या मूर्तीला नवी मुंबई विभागातून सर्वोत्कृष्ट मूर्ती व सर्वोत्कृष्ट मूर्तिकार. वैशाली सामंत यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रदान.

सर्वोत्कृष्ट मूर्ती

लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा (२०१८)

सर्वोत्कृष्ट मूर्ती

नवसाला पावणारा महाराजा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर-१०, वाशी — नवी मुंबई विभागामधून सर्वोत्कृष्ट मूर्ती विजेता म्हणून गौरव. सन्मानपत्र लोकसत्ता संपादक गिरीश कुबेर यांच्या सहीने.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारतीय रत्न सन्मान
Featured

राष्ट्रीय सन्मान (२०२३)

डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारतीय रत्न सन्मान

मूर्तिकार बाबी बांदेकर आणि पंचरत्न टीम, चेंबूर, मुंबई — गणेश व दुर्गा मूर्तींतील उत्कृष्ट कारागिरी आणि परंपरा जपण्यासाठी सन्मानित (१९ ऑगस्ट २०२३).

सुबक मूर्ती पुरस्कार २०२५

द्वितीय पारितोषिक

सुबक मूर्ती पुरस्कार २०२५

संस्कृती उत्सव नवी मुंबई — लोकमान्य सेवा समिती, सेक्टर-४, ऐरोली येथील ऐरोलीचा महाराजा मूर्तीला द्वितीय पारितोषिक.

मानचिन्हे